शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
2
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
3
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
4
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
5
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
6
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
7
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
8
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
9
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
10
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
11
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
12
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
13
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
14
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
15
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
16
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
17
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
18
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
19
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
20
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू

लाच स्वीकारताना मंडल अधिकारी जेरबंद

By admin | Published: May 13, 2014 11:37 PM

जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी रुईछत्तीसी (ता. नगर)मंडळाचे मंडल अधिकारी अविनाश मनोहर दाभाडे याला दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

अहमदनगर : जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी रुईछत्तीसी (ता. नगर)मंडळाचे मंडल अधिकारी अविनाश मनोहर दाभाडे याला दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दाभाडे याला अटक करण्यात आली आहे. नाशिक विभागाने दोन पोलिसांना लाच घेताना पकडल्यानंतर २४ तासांच्या आतच ही दुसरी घटना घडली आहे. तक्रारदारांच्या आईच्या नावे सन २००१ मध्ये मठ पिंपरी (ता.नगर) येथील एक एकर चार आर या खरेदी केलेल्या जमिनीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी दाभाडे याने तक्रारदार यांच्याकडे दीड हजार रुपये मागितले. ही लाच दाभाडे याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता नगरच्या तहसील कार्यालयात स्वीकारली. दरम्यान दाभाडे यांच्या रेल्वेस्टेशन रोडवरील आगरकर मळ््यामधील घराचीही झडती घेण्यात आली. मात्र त्यामध्ये काहीही सापडले नाही, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक देवरे यांनी दिली. लाचलुचपतचे कार्यालय असलेल्या आवारातच दाभाडे याने लाच स्वीकारल्याने अधिकार्‍यांवर धाक नसल्याची चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी) बंगल्याची झडती मंडलाधिकारी असलेला दाभाडे यांचे वडील प्राचार्य होते. त्यांचा रेल्वेस्टेशन रोडवरील आगरकर मळ्यात एक मोठा बंगला आहे. त्या बंगल्यामध्येच दाभाडे कुटुंबासह राहतो. या बंगल्यात आणखी दोन-तीन भाडेकरूही राहतात. शिवाय दाभाडे मंडलाधिकारी आहे. त्यामुळे त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मात्र केवळ दीड हजार रुपयांसाठी दाभाडे लाचेच्या जाळ्यात अडकला.