अहमदनगर : नवनागापूर (ता. नगर) येथे गुरुवारी (दि. २६) दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक बालसुसंस्कार केंद्रात नवनागापूर परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल १४ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता आठवीतील ५ विद्यार्थ्यांना यश मिळाले तर दहावीतील प्रतीक्षा जरे ही प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात १४ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. इयत्ता नववीतील प्रतीक्षा मायकर जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. या विद्यार्थ्यांचा श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, माजी सरपंच दत्ता पाटील सप्रे, सदस्य सागर सप्रे, संजय चव्हाण, गोरख गव्हाणे, दीपक गीते, मंगल गोरे, सत्यभामा डोंगरे, रंजना दांगट, केंद्र प्रमुख गणेश पर्वत, अक्षय पिसे, चंद्रकांत भणगे, आदिनाथ डोंगरे, सुरेश निकम, सुभाष इथापे, संदीप खोमणे, सुभाष होले, सचिन लिमकर, मनोज टीमकरे व सचिन पुंड उपस्थित होते.
...........
२७ नवनागापूर
स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने गुरुवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, माजी सरपंच दत्ता पाटील सप्रे, सदस्य सागर सप्रे, संजय चव्हाण, गोरख गव्हाणे आदी उपस्थित होते.