होमराज कापगते यांचे प्रतिपादन : जांभळी येथे लोककला महोत्सव थाटात, १८१ कलावंतांचा सत्कारसाकोली : पूर्वीच्या काळी मनोरंजनाचे एकमेव साधन भारतीय लोककला होती. या लोककलेल्या माध्यमातून लोकांचे मनोरंजन होत होते. मात्र काळानुसार विज्ञानाने अविस्कार केला व मनोरंजनाचे अनेक माध्यम प्रगत झाली. या आधुनिक मनोरंजनाच्या ओघात पारंपारिक लोककला लुप्त झाल्या असल्या तरी ग्रामीण कलाकारांनी लोककलेला जिवंत ठेवून लोककला जतन करण्याचे काम केले आहे. त्यांचा सत्कार म्हणजे लोककलेचाच सत्कार होय, असे मत जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते यांनी केले.मार्तंडराव पाटील कापगते विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय जांभळी सडक येथे आयोजित विदर्भ विभागीय विविध लोककला महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर केंद्रीय अध्यक्ष धर्मदास भिवगडे, लाखनीचे उपसभापती वसंता कुंभरे, आशीर्वाद राहुले, दशरथ बावणे, देवराम शेंडे, राजेश शेंडे, मिलिंद खोब्रागडे, ज्योती वाघाये, अर्चना बावणे, कैलास गेडाम, सरपंच शशीकला नंदुरकर, उपसरपंच अशोक हुमणे उपस्थित होते.प्राचार्य कापगते म्हणाले, भारत सरकारने २०१६ हे वर्ष समता सामाजिक न्याय हे उद्दीष्टे ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमीत्ताने त्यांचे विचार मनामनात रूजविण्यााठी साजरे करण्याचे ठरविले आहे. शासनाच्या या धोरणानुसार विदर्भ शाहीर कलाकार परिषदेने पाचवा विदर्भ विभागीय विविध लोककला महोत्सव व १८१ वृद्ध कलावंत साहित्यीक यांचा जाहीर सत्कार करण्याचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक लोककलेचा सर्वांगिण विकास तसेच नवीन पिढीला जागृत करण्याच्या उद्देशाने विदर्भातील असलेल्या सर्व पारंपारिक लोककलेचा प्रसार व प्रचार तसेच जतन व्हावे यासाठी सतत कार्यरत असलेल्या व साक्षणाच्या विविध योजना राबवित असलेल्या विदर्भ शाहीर कलाकार परिषद भंडाराच्या वतीने कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्या समता बंधुत्व व राष्ट्रीय एकात्मता निर्माण व्हावी या हेतुने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवसीय या लोककला महोत्सवात भजन, दंडार, किर्तन, खडीगंमत, गोंधळ, नाटक, भारूड, पोवाडा यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले तर प्राचार्य होमराज कापगते यांच्या हस्ते १८१ वृद्ध कलावंत साहित्यीक यांचा सपत्नीक जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मिलिंद खोब्रागडे तर आभार प्रदर्शन ऋषी वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील कलावंत व नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
जनावरांच्या बाजारामुळे वाळकीच्या बाजाराला पुनर्वैभव
By admin | Published: October 19, 2016 12:46 AM