अहमदनगर : बालकांच्या मोफत शिक्षणाच्या कायद्यानुसार शिक्षण आयुक्त यांनी नगर जिल्ह्यात नव्याने १४२२ ठिकाणी आठवीचे तर १८८ ठिकाणी पाचवीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे. या वर्गांसाठी अतिरिक्त शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. शिक्षण आयुक्तांनी या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक करूनच शिक्षकांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिलेले आहेत. बालकांचा मोफत शिक्षणाचा कायदा २००९ नुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये नैसर्गिक वाढीने नियम व अटीनुसार पाचवी आणि आठवीच्या वर्गांना मान्यता दिलेली आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडे पाठविण्यात आले होते. याबाबचे आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त झालेले आहे. यात ज्या एक किलो मीटर परिसरात पाचवीचा वर्ग आणि तीन किलो मीटर परिसरात आठवीचा वर्ग नाही, अशा ठिकाणी नव्याने या इत्तेचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच या वर्गांना स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा संबोधण्यात येणार आहे. या जिल्ह्यात अशा प्रकारे १६१० नव्याने वर्ग सुरू होणार असून त्या ठिकाणी अतिरिक्त शिक्षकांची आवश्यकता भासणार आहे. जिल्हास्तरावर अतिरिक्त होणार्या शिक्षकांचे या ठिकाणी समायोजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) शिक्षण विभागाने आधी शिक्षकांचे समायोजन, त्यानंतर पदोन्नती, पाचवी आणि आठवीचे नव्याने सुरू होणारे वर्ग या ठिकाणी शिक्षकांची नेमणूक करावी. त्यानंतर श्क्षिकांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी केली होती. -संजय कळमकर, शिक्षक नेते. तालुकानिहाय वर्ग खोल्याची संख्या (५ वी, ८ वी एकत्र) अकोले २८३, संगमनेर २१९, कोपरगाव ८४, राहाता ७३, राहुरी १८४, श्रीरामपूर ७०, नगर १३४, पारनेर २२, श्रीगोंदा १९६, कर्जत २१२, जामखेड १०२, शेवगाव १८०, पाथर्डी ७१, नेवासा ९४ यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या ठिकाणी वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांना पाठविला होता. यातून त्यांनी १६१० ठिकाणी वर्ग सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे.
पाचवी, आठवीच्या १६१० वर्गांना मान्यता
By admin | Published: May 21, 2014 12:06 AM