राहुरी : मुळा धरण सलग दोन वर्षे शंभर टक्के क्षमतेने भरल्याने यंदा उस लागवडीखालील क्षेत्र वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राहुरी तालुक्यामध्ये ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
भाजीपाला व फळे यांचे दर कोसळले आहेत. मंदीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. भाजीपाला व फळे यांचे दर कोसळल्याने शेतकरी पुन्हा ऊस पिकाकडे वळला आहे. राहुरी तालुक्यात कितीही ऊस उत्पादन केला तरी १२ कारखाने ऊस नेत असल्याने शेतकरी बिनधास्त आहेत. यंदा राहुरी तालुक्यात विविध प्रकारची ऊस लागवड करण्यात येत आहे. पाच ते सहा हजार रुपये एकर याप्रमाणे मजूर ऊस लागवडीचा दर घेत आहेत. पुढील वर्षी राहुरी तालुक्यात १४ ते १५ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राहुरी येथील डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे व वांबोरी येथील प्रसाद शुगर या दोन्ही कारखान्यांनी गाळपक्षमता वाढविली आहे. तीन ते चार हजार रुपये टन याप्रमाणे उसाच्या बेण्याची विक्री होत आहे.
...
मंदीमुळे फळे व भाजीपाल्याचे दर कोसळले आहेत. खर्चाच्या तुलनेत पिकलेले फळे व भाजीपाल्यांना भाव कमी मिळत आहे. त्यामुळे झालेला खर्चही निघेनासा झाला आहे. त्यात मजुरीचा खर्चदेखील वाढला आहे. भुसार पिकापेक्षा ऊस पिकामध्ये थोडाफार का होईना पैसा शिल्लक राहतो.
-सचिन म्हसे, ऊस उत्पादक शेतकरी, राहुरी.
..
फोटो-०९राहुरी ऊस
...
ओळी-राहुरी तालुक्यात ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ऊस लागवड करताना शेतकरी.