राहुल कुलट, शरद पुजारी, प्रमोद खराडे, अनुज घोडके, वर्षा गुंड, नीतू अहिरे, विनोद वाघमारे, मोहम्मद पठाण, योगेश जगदाळे, राम हजारे, रोहित थोरात, बैजू रणनवरे, शुभम लगड, सात्त्विक दिवटे, अनिकेत आठरे, अविनाश गारुडकर, अभिषेक आंबेकर, अतुल वाघमारे, यश जाधव, अभिजित परदेशी, अब्दुल शेख, शुभम सांगळे, चौताली खंडागळे, संजय धोत्रे, प्रज्ज्वल पगारे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
अनुकंपाअंतर्गत १६ मार्च रोजी पोलीस भरतीसाठी ३३ उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. यामध्ये २९ पैकी २५ उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी करून बुधवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. ४ उमेदवारांच्या प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णयानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
----------------------------
कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिसांच्या मुलांना नियुक्ती
कोरोनामुळे सात पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. यांतील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. दोन अंमलदारांचे पाल्य लहान असल्याने त्यांना सध्या नियुक्तीपत्र देण्यात आले नाही. यातील दोन उमेदवार अपात्र ठरले तर एका पोलीस अंमलदाराचे कागदपत्र कार्यालयाकडे सादर केल्यानंतर त्यांच्या पाल्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे.
फोटो - १७ पोलीस भरती
ओळी- नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांच्या हस्ते अनुकंपा तत्त्वावर भरती करण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.