शहरं
Join us  
Trending Stories
1
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
2
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
3
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
4
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
5
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
6
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
7
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
8
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
9
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
10
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
11
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
12
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
13
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
14
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
15
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
16
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
17
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
18
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
19
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
20
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान

शिरसगावातील उपबाजार स्थलांतरास शेतक-यांचा नकार; शंभर रोजगारांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 4:11 PM

सध्या ही उपबाजार समिती कायम ठेवण्यासाठी तिळवणीस नेण्यास कोपरगाव बाजार समितीचा प्रयत्न सुरु आहे. कोपरगाव बाजार समितीने तिळवणी येथे उपबाजार समिती करिता जागा खरेदी केली आहे. मात्र या स्थलांतरास शेतक-यांनी विरोध दर्शवला आहे. 

शिरसगाव : कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती सध्या प्रायोगिक तत्वावर दोन वर्षांपासून चालू आहे. सध्या ही उपबाजार समिती कायम ठेवण्यासाठी तिळवणीस नेण्यास कोपरगाव बाजार समितीचा प्रयत्न सुरु आहे. कोपरगाव बाजार समितीने तिळवणी येथे उपबाजार समिती करिता जागा खरेदी केली आहे. मात्र या स्थलांतरास शेतक-यांनी विरोध दर्शवला आहे. दोन वर्षांपासून शिरसगावात प्रायोगिक तत्त्वावर बाजार समितीतर्फे  कांदा व भुसार मालाची खरेदी केली जात आहे. शिरसगावात जवळपास १०० ते १५० बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाला आहे. शिरसगावात उपबाजार समिती कायमस्वरूपी ठेवण्यासाठी मार्केट कमिटीची स्वत:ची जागा नसल्याने अडचण होत आहे. कमीत कमी दोन एकर जागा मिळाली तरच शिरसगावात उपबाजार समिती कायमस्वरूपी ठेवण्यात येईल असे कमिटीने शुक्रवारी २१ तारखेला झालेल्या  बैठकीमध्ये सांगितले आहे. शिरसगावात उपबाजार समिती कायमस्वरूपी होईल, अशा आशयावर आजूबाजूच्या व्यापाºयांनी मार्केटमधील माल खरेदी करण्यासाठी स्वत:ची जागा खरेदी केली आहे. या जागेसाठी व्यापाºयांनी लाखो रुपये गुंतवले आहे. यामुळे शिरसगावातील ग्रामस्थांनी आपल्या स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. शिरसगावात ३ ते ४ हॉटेल आहेत. यात हॉटेल व्यवसायात दररोज जवळपास लाखाच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. तरी ही उपबाजार समिती दुसरीकडे हलवू नये, असा शेतकºयांचा दबक्या आवाजात सूर उमटत आहे.

येत्या शुक्रवारपर्यंत शिरसगावात शिरसगाव उपबाजार समितीसाठी कमीत कमी दोन एकर जागा कायमस्वरूपी दिली तर शिरसगावात उपबाजार समिती कायम ठेवण्यात येईल, असे कोपरगाव बाजार समितीचे सभापती संभाजी रक्टाटे यांनी सांगितले.

शिरसगावात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांचा प्रपंच सुखरूप चालू आहे. बाजार समिती दुसरीकडे गेल्यास रोजगारांवर उपासमारीची वेळ येईल, असे ग्रामपंचायत सदस्य कैलास मढवे यांनी सांगितले.   

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगावonionकांदाFarmerशेतकरी