याबाबत सिटी केअर हाॅस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राहुल ठोकळ यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सिटी केअर हाॅस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार केले जातात. येथे आयसीयूमध्ये टाकळी काझी (ता. नगर) येथील तानाजी नारायण गडाख (वय ७२) हे दाखल होते. त्यांची तब्बेत खालावल्यानेे त्यांना ॲाक्सिजनवर ठेवण्यात आले होते; परंतु ते वारंवार ॲाक्सिजन मास्क बाजूला काढत होते. त्यामुळे त्यांच्या एका नातेवाइकाला त्यांच्याबरोबर थांबण्याची परवानगी देण्यात आली होती. दरम्यान, गुरुवारी रात्री साडेबारा वाजता तानाजी गडाख यांचे निधन झाले. याबाबत त्यांचा मुलगा पंकज गडाख (वय ३०) व त्याचा मावसभाऊ रोहन पवार (वय २१, दोघे. रा. टाकळी काझी) यांना माहिती दिली. त्यांनी डाॅ. ठोकळ यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच ओपीडीमधील टेफिफोन, व्हिवो मशीन व इतर ठिकाणी तोडफोड केली. याशिवाय हाॅस्पिटलचा कर्मचारी प्रवीण गायकर यालाही मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
रूग्ण दगावल्याने नातेवाइकांची डाॅक्टरांना मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:21 AM