कोपरगाव : कोपरगाव शहराला पिण्याच्या पाण्याचे एकच आवर्तन होईल, एवढाच पाणीसाठा येसगाव येथील साठवण तलावात उपलब्ध आहे. पाटबंधारे विभागाने हे साठवण तलाव २९ ऑक्टोबरला भरून दिले होते. त्यानंतर आता या साठवण तलावातील पाण्याने तळ गाठला आहे. डाव्या कालव्याला पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्याच्या मागणीचे २५ नोव्हेबर २०२० रोजी कोपरगाव नगर परिषदेने नाशिक पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केलेला आहे; परंतु अद्यापपर्यंत पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात आले नाही, तर कोपरगाव शहरवासीयांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी शक्यता मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी व्यक्त केली आहे.
लवकर आवर्तन सोडावे
By | Published: December 05, 2020 4:35 AM