काष्टी : घोड व कुकडी लाभक्षेत्रातील पाण्याची पातळी खालावू लागली आहे. त्यामुळे घोड, कुकडीचे शेतीसाठीचे आवर्तन १५ जानेवारीपासून सोडावे, अशी मागणी नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
नागवडे म्हणाले, घोड धरणातून तीन, कुकडीतून शेतीसाठी दोन आवर्तन देता येऊ शकतात. कालवा सल्लागार समितीची उशिरा बैठक झाली. या बैठकीत जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास होता. मात्र, कालवा सल्लागार समितीने कुकडीचे १ फेब्रुवारी,, तर घोडचे १० फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कालवा सल्लागार समितीने आपल्या निर्णयात बदल करणे गरजेचे आहे, असेही नागवडे यांनी म्हटले आहे.