शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

मधुमेहींसाठी दिलासा! संजीवनी कारखाना बनवतोय शुगर फ्री साखर , गोड लागेल; परंतु ‘शुगर’ नाही वाढणार

By सचिन धर्मापुरीकर | Published: December 14, 2023 6:32 AM

भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय असून ती वाढतेच  आहे.

सचिन धर्मापुरीकर

कोपरगाव  (जि. अहमदनगर) : भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय असून ती वाढतेच  आहे. या परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील सहकारमहर्षी  शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने ‘शुगर फ्री’ साखर बनविण्याची तयारी  सुरू केली आहे. कारखान्याच्याच प्रयोगशाळेत संशोधन सुरू असून, त्याला ५० टक्के यश मिळाले आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जागतिक साखर धंद्याला वेगळी दिशा मिळेल,  भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केलेल्या संशोधनात देशात तब्बल १०.१ कोटी मधुमेही असल्याचे समोर आले आहे.

ही गंभीर बाब डोळ्यांसमोर ठेवून कारखान्याने जिभेला गोड तर लागेल; परंतु, रक्तातील साखर वाढणार नाही, अशी साखर बनविण्याचे ठरविले. साखरेमध्ये सल्फर आहे, त्याचे शरीरावर परिणाम होतात असे मानले जाते.

साखरेला पांढरा रंग येण्यासाठी सल्फरचा वापर केला जातो. आता सल्फरविरहित साखर बनविण्यास कोल्हे कारखान्याने सुरुवात केली आहे.  रॉ शुगरमध्ये सल्फर नसते. ती पांढऱ्या रंगाची नसते. रॉ शुगर येथे तयार होते. आता सल्फरविरहित ‘शुगर फ्री‘ साखर बनणार आहे. कारखान्याच्याच प्रयोगशाळेत संशोधन सुरू आहे. तीन शास्त्रज्ञ यावर काम  करीत आहेत. त्यांना ५० टक्के यश मिळालेले आहे.