रामहरी बाळासाहेब घोडेचोर (वय २२ रा. देवसडे ता. नेवासा), आनंद कूंजाराम थोटे (वय २८ रा. भातकुडगाव ता. शेवगाव), पंकज गोरक्षनाथ खरड (वय २९ रा. देवटाकळी ता. शेवगाव) सागर तुकाराम हंडे वय (३० रा. खरवंडी ता. नेवासा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. काळ्याबाजारात विक्रीसाठी या आरोपींना इंजेक्शन पुरविणारा राकेश हेमंत मंडल (रा. वडाळा ता. नेवासा) हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नगर-औरंगाबाद रोडवरील वडाळा बहिरोबा येथील एका हॉटेलसमोर सापळा लावून पोलिसांनी या आरोपींना अटक केली. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अशोक राठोड यांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, मिथुन घुगे, उपनिरीक्षक गणेश इंगळे, पोलीस नाईक सुरेश माळी, संतोष लोढे, शंकर चौधरी, दीपक शिंदे, मेघराज कोल्हे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
.......
बनावट ग्राहक पाठवून केला पर्दाफाश
पोलिसांनी आधी एका आरोपीला फोन करून इंजेक्शन खरेदी करावयाचे असल्याचे सांगितले. आरोपीने एका इंजेक्शनची किंमत ३५ हजार रुपये सांगितली व वडाळा बहिरोबा येथील एका हॉटेलजवळ बोलविले. यावेळी पोलिसांनी एक डमी ग्राहक पाठवून सापळा लावत घोडेचोर व थोटे या दोघा आरोपींना जेरबंद केले. या दोघांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना इंजेक्शन पुरविणारा हेमंत मंडल याचा पोलिसांनी नेवासा फाटा परिसरात शोध घेतला मात्र, तो मिळून आला नाही. पोलिसांनी त्याची कार जप्त केली आहे. या कारमध्ये पोलिसांना एक रेमडेसिविर इंजेक्शन मिळून आले.
.........
ओळी- १०एलसीबी
रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.
फोटो मेलवर टाकला आहे