अहमदनगर : कोणालाही विश्वासात न घेणे, मंडळाचा आदेश न पाळणे, मंडळाविरोधी वर्तणूक करणे, असा ठपका ठेवून संजय शिंदे यांची गुरुमाउली मंडळातून हकालपट्टी केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, गुरुमाउली मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी दिली़५ सप्टेंबर रोजी गुरुमाउली मंडळाची राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस नीळकंठ घायतडक यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली़ या सभेत शिंदे यांच्या हकालपट्टीचा ठराव घेण्यात आला़ याबाबत जगताप म्हणाले, २१ आॅगस्ट रोजी विकास मंडळाचे अध्यक्ष शिंदे यांना राजीनामा देण्याचा आदेश गुरुमाउली मंडळाने दिला होता़ परंतु राजीनामा न देणे, मासिक सभेचे इतिवृत्त स्वत:च्या घरी ठेवणे, कोपरगावचे विश्वस्त रमेश दरेकर यांना गैरहजर दाखवून जाणीवपूर्वक त्यांचे विश्वस्तपद रद्द करणे, संकुल बांधकामाबाबत विश्वस्तांना विश्वासात न घेणे, विकास मंडळाची सभा बेकायदेशीररित्या ठरवणे, सेवानिवृत्त शिक्षकाला विश्वस्त म्हणून घेणे अशा शिंदे यांच्या मनमानी कारभाराबद्दल सभेमध्ये चर्चा झाली़ त्यानंतर शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष रावसाहेब सुंबे, गुरुमाउलीचे अध्यक्ष तांबे, राज्य संघाचे उपाध्यक्ष कैलास चिंधे, दत्ता कुलट, बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे, रामेश्वर चोपडे, बाळासाहेब तापकीर, शिक्षक बँकेचे अध्यक्ष साहेबराव अनाप, उपाध्यक्ष बाळासाहेब मुखेकर, विकास मंडळाचे विश्वस्त लक्ष्मण सोनवणे, पांडुरंग खराडे, गोकुळ गायकवाड, सर्जेराव घोडके, रमेश दरेकर उपस्थित होते़काय निर्णय घेतला माहित नाहीमाझ्या साडेतीन वर्षाच्या काळात मी विकास मंडळाच्या हिताचेच निर्णय घेतले़ नि:स्वार्थीपणे काम केले़ पण त्यांनी काय निर्णय घेतला आहे, हे मला माहित नाही, असे प्राथमिक शिक्षक विकास मंडळाचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले.
गुरुमाउली मंडळातून विकास मंडळाच्या अध्यक्षांची हकालपट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:45 AM