भाऊसाहेब येवलेराहुरी : मुळा धरणावर रविवारची सुट्टी असल्याने जिल्हाभरातून पर्यटक आले होते़ अचानक पर्यटक मुळा धरणाच्या भिंतीवर गेल्याने पाटबंधारे खात्याची त्रेधातिरपीट उडाली़ प्रवेशव्दार चौकीवर असलेल्या चार पोलिसांना पाचारण केल्यानंतर पर्यटकांची हकालपट्टी केली़ सेल्फी काढणा-यांनाही पोलिसांनी हुसकावून लावले़रविवार असल्यामुळे मुळा धरणाकडे पर्यटकांची रीघ लागली होती़ प्रवेशव्दारावर असलेल्या पोलीस चौकीतून पास दाखविल्याशिवाय आत सोडले जात नव्हते़ पर्यटक आत सोडा म्हणून पोलिसांना विनवणी करीत असल्याचे चित्र समोर आले़ पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता पोलिसांनी धरणाकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी घातली़ मुळा धरणाकडे जाणाºया रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांची रविवार असल्याने वर्दळ वाढली होती़ पर्यटक मो-यावर असलेल्या रस्त्यावरून वावरत होते़ पर्यटक दरवाजाच्यावर असलेल्या कळ दाबण्याच्या चेंबरजवळ जाऊन सेल्फी काढू लागले़ त्यानंतर कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली़ पोलीस धरणाच्या मोºयावर दाखल झाले़मुळा धरणाअंतर्गत २५० कर्मचारी होते़ आता कर्मचाऱ्यांची संख्या १४ वर आली आहे़ ३१ मे ला ५ कर्मचारी निवृत्त झाले़ शासनाने नवीन कर्मचारी भरती केलेली नाही़ त्यामुळे कमी कर्मचाºयांवर धरणाचे व्यवस्थापन करणे हे मोठे आव्हान पाटबंधारे खात्यासमोर आहे़नव्याने नोकरभरती नसल्याने धरणाचा मोठा गाडा चालवायचा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे़‘‘मुळा धरणावर पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता राहुरीचे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना पत्र देण्यात आले आहे़ काही पर्यटक हुल्लडबाजी करतात. त्यादृष्टिकोनातून कळविण्यात आले आहे़ पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता खासगी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. धरणाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जात आहे़ पर्यटकांनी सहकार्य करावे़’’ - रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे, अहमदनगर.