अहमदनगर : पाईपलाईन रोडवरील डुंगरवाल हॉस्पिटल ते वडगाव गुप्ता रोडवरील अतिक्रमण न काढता रुंदीकरण सुरू असून, या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता रुंद करावा, अशी मागणी माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
पाईपलाईन रोडवरील डुंगरवाला हॉस्पिटल ते वगडगाव पंपिंग स्टेशन रस्त्याच्या रुंंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की हा रस्ता ३० मीटर इतक्या रुंदीचा आहे. प्रत्यक्षात मात्र हा रस्ता १० ते १२ मीटर इतकाच रुंद आहे. सदर रस्त्याचे नगररचना विभागाकडून मोजमाप करून कामाला सुरुवात करावी. या भागात झपाट्याने लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली असून, हा रस्ता ३० मीटर रुंदी करून मध्यभागी दुभाजक बसवावे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही. याशिवाय रस्त्यावर पुढे महापालिकेच्या पंपिंग स्टेशनची जागा अंदाजे २ ते ३ एकर असेल. तिथे महापालिकेच्या मालकीची एक वहीरदेखील आहे. जागेभाेवती झालेले अतिक्रमण काढून भूखंडाभोवतील संरक्षण भिंत बांधून कायमस्वरूपी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
.............
सूचना फोटो: २६ शिंदे नावाने आहे.