भाजी मंडईची अतिशय दुरवस्था झाली होती. भाजी विक्रेते तसेच नागरिकांना त्याचा त्रास होत होता. त्यामुळे नूतनीकरण करण्यात आले, असे आदिक म्हणाल्या. याप्रसंगी भाजी विक्रेते विजय आखाडे, गणेश परदेशी, अनिल हरकल, कैलास भांबारे, संजय भांबारे, वसंत शेटे, निर्मला मेहेत्रे, भांबाबाई कापकर, संगीता शिंदे, दीपक गाडेकर उपस्थित होते.
-------
टेकावडे यांच्यानंतर नूतनीकरण
माजी नगराध्यक्ष ज.य. टेकावडे यांच्या सत्तेच्या काळात नेहरु भाजी मंडई सुरू करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्षा आदिक यांनी त्याचे नूतनीकरण केले. भाजीपाला विक्रेत्यांचे हे प्रमुख केंद्र आहे. शहरवासीयांची येथे खरेदीनिमित्त दिवसभर गर्दी असते. त्यामुळे येथे आवश्यक त्या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत.
-----------
फोटो ओळी : २०भाजी मंडई
पालिकेच्या नेहरू भाजी मंडईच्या नूतनीकरणानंतर उद्घाटन करताना जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे.
---------