ॲड. शिवूरकर म्हणाल्या, गेल्या ७७ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर तीन काळे कृषी कायदे रद्द करावेत, शेतमालाला हमीभाव द्यावेत इत्यादी मागण्यांसाठी किसान संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू आहे. शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत असताना केंद्र सरकार आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांना भेटायला गेलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांना रस्त्यात टाकलेल्या तारांमुळे आणि ठोकलेल्या खिळ्यांमुळे आंदोलकांना भेटता आले नाही. आंदोलनाच्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर केसेस टाकण्यात आल्या. आंदोलकांचे पाणी तोडण्यात आले. सरकारच्या दडपशाही नंतरही आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. केंद्र सरकारच्या लोकशाही विरोधी कृतींचा निषेध करण्यासाठी आज देशभर किसान संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको-चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा भाग म्हणून संगमनेर येथे किसान संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येते आहे.
-----------
(०७ संगमनेर आंदोलन)
केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात संगमनेर बसस्थानकासमोर किसान संघर्ष समितीच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.