केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा; संगमनेरात कॉँग्रेसचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 11:58 AM2020-12-03T11:58:31+5:302020-12-03T11:59:07+5:30
संगमनेर : केंद्र सरकारने मंजूर केलेले नवे कृषी व कामगार विधेयक मागे घ्यावे. अशी मागणी कॉँग्रेसच्यावतीने करत गुरूवारी (दि.०३) संगमनेर शहरातील नवीन नगर रस्ता येथे आंदोलन सुरू केले आहे.
संगमनेर : केंद्र सरकारने मंजूर केलेले नवे कृषी व कामगार विधेयक मागे घ्यावे. अशी मागणी कॉँग्रेसच्यावतीने करत गुरूवारी (दि.०३) संगमनेर शहरातील नवीन नगर रस्ता येथे आंदोलन सुरू केले आहे.
कृषी विधेयक मागे घेण्यासाठी दिल्लीत शेतकºयांनी सुरू केलेल्या आंदोलनाला कॉँग्रेसच्यावतीने पाठिंबा जाहिर करण्यात आला.
या आंदोलनात नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ आरगडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र सांगळे, नगरसेवक हिरालाल पगडाल, शेतकरी नेते अरूण कान्होरे , अहमदनगर जिल्हा युवक कॉँग्रेसच्या उत्तर विभागाचे कार्याध्यक्ष अभियंता सुभाष सांगळे, एनएसयुआयचे संगमनेर शहर कार्याध्यक्ष शेखर सोसे, माजी नगरसेविका सौदामिनी कान्होरे आदी सहभागी झाले आहेत. यावेळी कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.