हेमंत आवारीअकोले : जैवविविधतेचे लेणं व पर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील बिटिशकालीन भंडारदरा धरण गेल्या ४० वर्षात फक्त पाच वेळा १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या आठ दिवसात झालेल्या जोरदार पावसाने धरण शनिवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले.सध्या भंडारदरा परिसरात ‘जलोत्सव’ साजरा होत आहे. धरणाच्या पाणलोटातील ४० किलोमीटरच्या ‘रिंग रोड’भागात असंख्य शुभ्र चंदेरी जलप्रपात-धबधबे फेसाळले आहेत. ओढे, नाले खळखळून भरभरुन वाहत आहेत. धरणाच्या ‘स्पिल वे’सांडव्याच्या जवळून पाणलोटाच्या सफरीला सुरुवात करायची.मुतखेल येथेल वावडीच्या डोंगरावरुन हवेत थुईथुई उडणारे प्रपात, कोलटेंभे येथील गायमुखासह चार- सहा मोठे आणि असंख्य छोटे उंच कड्यावरुन कोसळणारे धबधबे, रतनवाडीच कातळशिल्प अमृतेश्वर मंदिर, साम्रद येथील अद्भूत रम्य सांधनदरी, घाटघरचा कोकणकडा, उदंचल जलविद्युत प्रकल्पाचा अप्पर डॅम, मोटाचा डोंगर व अलंग-मलंग-कुलंग तसेच कळसुबाई शिखरावरुन कोसळणारे उडदावणे पांजरे येथील धबधबे बघत मुरशेत मार्गे शेंडीत पोहचायचे आणि धरणाच्या भिंतीजवळ विसावा घ्यायचा असा जलोत्सवाचा आनंद पर्यटक ‘विक एण्ड’ ला घेत आहेत. १५ आॅगस्टला येथे निसर्गप्रमींची जनू जत्राच भरते.भंडारदरा धरणाच्या कामास बिटिशांनी १९१० साली प्रारंभ केला. त्या आधी १८९०च्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील ओझर येथे पिकअप आॅल बांधून कालवे निर्माण करण्यात आले होते.१९२६ ला दगड-गुळ चुण्यातील या धरणाचे काम काम पूर्ण झाले. १९२२ ला धरणात पाणी साठवायला सुरुवात झाली. धरणाचे पाणलोटक्षेत्र १२१ चौरस किलोमीटर इतके आहे.‘आधी कालवे मग धरण’ अशी या धरणाची ख्याती आहे. १९८० पासून आतापर्यंत १९९०, २००५, २०११ व २०१८, २०१९असे चार वेळा १५ आॅगस्टपूर्वी तर गेली ३९ वर्षात १८ वेळा आॅगस्ट महिन्यातच भंडारदरा ओसंडल्याची नोंद आहे. केवळ सात वेळा म्हणजे १९८५, १९८६, १९८७, १९८९, १९९५, २००० व २०१५ ला भंडारदरा धरण रिते राहिले. पूर्ण क्षमतेने भरले नाही.नदीपात्रात पाणी सोडणारनिळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येईल. प्रवरा नदीकाठच्या गावांना सध्या कुठल्याही प्रकारचा धोका नाही. धरणातील विसर्ग वाढवताना वेळोवेळी महसूल व पोलीस विभागांना कळविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी सांगितले.देवठाण पाच वेळा रितेआढळा नदीवरील १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे देवठाण धरण २००३ पासून २०१८ पर्यंत पाच वेळा रिते राहिले. २००५ ला हे धरण ३० जून रोजी, २००६ ला २९ जुलै रोजी, २०१६ ला ३ आॅगस्ट रोजी तर २०१७ ला ३१ जुलै रोजी हे धरण ओसांडून वाहिले आहे.४गतवर्षी केवळ ६६० दशलक्ष घनफूट पाणी साठले होते. हे धरण देखील यंदा १५ आॅगस्टपूर्वी भरण्याची शक्यता आहे.निळवंडे दोनदाच भरले४८ हजार ३२० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या निळवंडे धरणात २००८ पासून थोडे, थोडे पाणी साठवण्यास सुरुवात करण्यात आली. १२ वर्षात दोनदा २०१६ व २०१७ ला ते पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्यावर्षी फक्त ६ हजार ९८९ दशलक्ष घनफूट इतके पाणी साठले होते.