विसापूर : सुरेगाव (ता.श्रीगोंदा) येथील व्यक्ती नगर येथे आपल्या मुंबई येथून आलेल्या मुलाला भेटायला गेले होता. त्यांचा मुलगा दि.२५ रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे सदर मुलाला भेटायला गेलेल्या वडिलांचा त्याच दिवशी स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. अखेर २७ जून रोजी सकाळी त्या संशयित व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने लोकांचा जिव भांड्यात पडला.
सुरेगाव येथील सदर व्यक्ती गावात अनेकांच्या संपर्कात आला होता. त्याने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. आरोग्य विभागानेही तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच दिवशी त्या व्यक्तीला तपासणीसाठी ताब्यात घेतले.
कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.प्रियंका शेंदूरकर व डॉ.अमोल आडसरे यांनी वेळीच दखल घेतली. अनेकांच्या संपर्कात आलेली ही व्यक्ती निगेटिव्ह निघाल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.