अहमदनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये शुक्रवारी (२६ जून) ७० व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील ५ रुग्ण बरे होऊन परतले घरी आहेत. या रुग्णांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बºया झालेल्या रुग्णांची संख्या आता २६५ इतकी झाली आहे.
कोरोनातून ब-या झालेल्या रुग्णामध्ये संगमनेर येथील ३, पाथर्डी आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ.बापूसाहेब गाढे यांनी दिली.