शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

कत्तलीसाठी जाणाऱ्या जनावरांची सुटका, श्रीरामपूर पोलिसांची कारवाई

By शिवाजी पवार | Published: April 17, 2023 3:48 PM

पीकअपसह चालक ताब्यात

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : शहर पोलिसांनी कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या सात जनावरांची एका वाहनातून सुटका केली. याप्रकरणी पीकअप चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली. जीप चालक (एमएच ०४ जीएफ ८७६५) जावेद मुस्ताक कुरेशी (वय २५, रा. बजरंग चौक, श्रीरामपूर) याच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोकनगरहून श्रीरामपूरकडे अतिशय निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून हर्षवर्धन गवळी यांनी हवालदार संतोष परदेशी यांना माहिती दिली. हरेगाव फाटा ते शिरसगाव रस्त्याने पोलिसांनी वाहनाचा शोध घेतला असता त्यांना एक पीकअप संशयास्पदरित्या जाताना दिसली. गाडी थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्यात २८०० रुपये किमतीची सात लहान वासरे मिळून आली. त्यांची चारा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. 

पीकअपसह पाच लाख २८०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. पोलीस कर्मचारी शरद अहिरे, किरण पवार, रघुवीर कारखेले, श्रीराम गोसावी यांनी कारवाई केली. शरद अहिरे तपास करत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी