शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

आरक्षणाचा मार्ग सुकर : धनगर समाजाला झेंडे दाखविण्याची पुन्हा वेळ येणार नाही - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 7:09 PM

मागील सत्तर वर्षांपासून ‘धनगड’ चा ‘धनगर’ करण्यात काँग्रेसने वेळ घातला.

जामखेड / हळगाव : मागील सत्तर वर्षांपासून ‘धनगड’ चा ‘धनगर’ करण्यात काँग्रेसने वेळ घातला. परंतु आम्ही सत्तेत येताच धनगर समाजाला न्याय देण्यासाठी आदिवासींच्या सवलती देण्याचा निर्णय घेत धनगड व धनगर हे दोन्ही एकच आहेत. यासाठी टिसचा अहवाल मागितला. त्यांनीही सकारात्मक अहवाल दिला. त्यानुसार आम्ही (सरकारने) न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे. आता धनगर समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग सुकर झाला असल्यामुळे आगामी काळात समाजाला काळे झेंडे दाखवण्याची वेळ येणार नाही, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९४ वा जयंती महोत्सव चोंडी कार्यक्रमात ते मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेकापचे आमदार गणपतराव देशमुख होते.पंकजा मुंडे म्हणाल्या, अहिल्यादेवी यांनी केलेले बांधकाम आजतागायत मजबूत आहेत. पण आघाडी सरकारच्या काळात झालेली बांधकामे फुंकली तरी पडत होती. अहिल्यादेवी व जिजाऊंचा आदर्श घेऊनच मी २०१४ साली संघर्ष यात्रा जिजाऊंच्या जन्मस्थळापासून सुरू करून चोंडी येथे अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी विसर्जन केले होते. त्यांच्या जयंतीच्या ठिकाणी आम्ही राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले.यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार विकास महात्मे, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, आमदार शिवाजी कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार भिमराव धोंडे, आमदार नारायण पाटील, आमदार सुरेश धस, आमदार रामराव वडकिते, रामहरी रूपनवर, माजी मंत्री बबनराव पाचपुते, पोपटराव गावडे, रमेश शेंडगे, प्रकाश शेंडगे, नानाभाऊ कोकरे विजय मोरे, आनंदकुमार पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती सूर्यकांत मोरे, पणन संचालक पांडुरंग उबाळे उपस्थित होते.प्रास्ताविक पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. सुत्रसंचालन प्रसाद बेडेकर व निलेश दिवटे यांनी तर आभार पांडुरंग उबाळे यांनी मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPankaja Mundeपंकजा मुंडेJamkhedजामखेड