राहुरी : देवळाली प्रवरा हद्दीतील प्रसादनगर झोपडपट्टीधारकांची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करून द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र तुकडेबंदी संघर्ष समन्वय समिती व राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप यांना देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा महाराष्ट्र तुकडेबंदी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, समितीचे कोशाध्यक्ष तथा राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामचंद्र काळे, समितीचे सचिव किशोर थोरात, समितीचे उपाध्यक्ष डॉ. विलास पाटील, समितीचे सदस्य सुनील कराळे, केदारनाथ चव्हाण, नगरसेवक तुषार शेटे, संतोष चोळके, राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनचे जिल्हाध्यक्ष प्रवीण लोखंडे, महिला जिल्हाध्यक्ष यमुनाताई भालेराव, तालुकाध्यक्ष बाबासाहेब साळवे, महिला तालुकाध्यक्ष रजनी कांबळे आदींनी हे निवेदन दिले.
...........
रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
राहुरी फॅक्टरी येथील चिंचविहिरे शिवेलगत असलेला गुंजाळ नाका ते प्रसादनगर या शिव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून हा शिव रस्ता मोकळा करून देणेची विनंतीही शिस्टमंडळाने केली असून तो रस्ता मोकळा करण्याची लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप व तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी दिल्याचे ढुस यांनी सांगितले.