कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक यांच्या हस्ते कामकाजाचे उद्घाटन झाले. यावेळी औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश एम. के. कोठुळे, जिल्हा न्यायाधीश माधुरी बरेलीया, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष काकडे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, ॲड. सुभाष भोर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना न्या. कंक म्हणाल्या, लोकन्यायालयाच्या माध्यमातून आपापसातील वाद सामोपचाराने मिटविणे शक्य आहे. कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित प्रकरणे मिटविण्यास प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अनेक विभक्त कुटुंबे पुन्हा एकत्र येत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. यावेळी ॲड. शारदा लगड, ॲड. संगीता देवचक्के, ॲड. सुनीता बाबर, ॲड. भानुदास होले, लक्ष्मण कचरे आदी उपस्थित होते.
-------------------------------------
फोटो – २५ अदालत
कौटुंबिक न्यायालयात आयोजित लोकन्यायालयाच्या उद्घाटनप्रसंगी न्या. नेत्रा कंक समवेत न्या. एम. के. कोठुळे, न्या. माधुरी बरेलीया, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, ॲड. सुभाष काकडे, ॲड. सुरेश लगड आदी.