श्रीगोंदा : तालुक्यात १५ एप्रिलनंतर ३५२ नागरिक बाहेरून आले आहेत. या नागरिकांना विविध ठिकाणच्या शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. अशा नागरिकांची देखभाल करण्याची जबाबदारी आता प्राथमिक शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारपासून शिक्षकांना शाळेत जावे लागणार आहे. सोमवारी तहसीलदार महेंद्र महाजन यांनी या संदर्भात लेखी आदेश काढला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी हा आदेश गटशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांना पाठविण्यात आला आहे. सर्व गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली कोविड ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे. शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांनी तपासणी व भोजन सर्व जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली आहे. त्यांचा रोज आरोग्य विभागाला रोज दैनंदिन अहवाल बंधनकारक राहणार आहे. या कामातून शिक्षिका व ज्या शिक्षकांनी चेक पोस्ट वर ड्युटी केली आहे त्यांना वगळण्यात आले आहे, असेही तहसीलदार महाजन यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
शिक्षकांवर क्वारंटाईन केलेल्या नागरिकांच्या देखभालीची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 5:52 PM