अहमदनगर : मोहटा देवस्थानची मंदिरातील मूर्तीखाली १ किलो ८९० ग्रॅम सोने पुरण्याची व त्याच्या विधीसाठी पंडिताला सुमारे २५ लाख रुपये देण्याची कृती कायदेशीर आहे का? याची निवृत्त धर्मादाय आयुक्त व माजी सरकारी लेखापालामार्फत तीन महिन्यांत चौकशी करा, अशी मागणी शिवसेना आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे. चौकशीत अडथळे येत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिल्यानंतर गोºहे यांनी ही मागणी केली आहे.जीर्णोद्धार करताना मूर्तीखाली सोने पुरल्याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्तमालिका प्रकाशित झाली. त्यानंतर गोºहे यांनी विधान परिषदेत प्रश्न मांडला. धर्मादाय उपआयुक्तांमार्फत चौकशीचा आदेश शासनाने दिला आहे. मात्र, नगरच्या धर्मादाय उपआयुक्तांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिकेचा हवाला देत चौकशीला स्थगिती दिली होती. ‘लोकमत’ने हे वृत्त देताच धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी चौकशी पूर्ण करण्याचा आदेश दिला.
‘निवृत्त धर्मादाय आयुक्तांमार्फत मोहटा देवस्थानची चौकशी करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 4:41 AM