शहरं
Join us  
Trending Stories
1
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
4
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
5
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
6
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
7
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
8
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
9
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
10
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
11
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
12
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
13
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
14
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
15
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
16
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
17
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
18
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
19
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
20
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी

श्रीगोंदा तालुक्यातून पाच हजार मजुरांची घरवापसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 8:14 PM

 श्रीगोंदा : पर जिल्हा व परप्रांतीय मजुरांचे लोंढे घराकडे पायी निघाले होते. या भयभीत झालेल्या जीवांना सहारा दिला आणि श्रीगोंदा तालुक्यातील ६ हजार ४०० मजूर व विद्यार्थ्यांपैकी ५ हजार १६८ मजुरांना रेल्वे, बस व खाजगी बसमधून घरपोहच करण्यात आले. तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या टीमने अहोरात्र परिश्रम करून घरवापसीची ही मोहीम फत्ते केली. यासाठी पोलिस, आरोग्य व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विशेष सहकार्य केले आहे. 

बाळासाहेब काकडे लोकमत न्यूज नेटवर्कश्रीगोंदा : पर जिल्हा व परप्रांतीय मजुरांचे लोंढे घराकडे पायी निघाले होते. या भयभीत झालेल्या जीवांना सहारा दिला आणि श्रीगोंदा तालुक्यातील ६ हजार ४०० मजूर व विद्यार्थ्यांपैकी ५ हजार १६८ मजुरांना रेल्वे, बस व खाजगी बसमधून घरपोहच करण्यात आले. तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या टीमने अहोरात्र परिश्रम करून घरवापसीची ही मोहीम फत्ते केली. यासाठी पोलिस, आरोग्य व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने विशेष सहकार्य केले आहे. तहसीलदार महेंद्र माळी यांनी परप्रांतीय मजुरांची घरवापसीसाठी तहसील कार्यालयात कक्ष स्थापन केला. नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, मंडलाधिकारी प्रशांत कांबळे यांच्यासह लिपिक व तलाठी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. मजुरांचे स्थलांतर परवाने तयार करून वाहनांची व्यवस्था केली. त्यांना जेवण, फूड पॉकेट आणि पाण्याची व्यवस्था केली. त्यांना बसमध्ये बसवून देईपर्यत दक्षता घेण्याचे धोरण घेतले. ---श्रीगोंद्यातून यवतमाळ -२३६८, वाशिम-५०७, हिंगोली-१५६, अकोला -१२३, नांदेड -१३८, उत्तर प्रदेश-७५२, मध्यप्रदेश-३८४, छत्तीसगड- ३४३ अशा मजुरांना सुखरुप पाठविण्यात आले आहे. वैद्यकीय कामासाठी बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी परवाने दिले. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली. आॅनलाईन पध्दतीने काही नागरिकांना स्थलांतर परवाने दिले.  --पुणे जिल्ह्यातून हिरडगावमध्ये एक जावई, त्यांची दोन मुले हे दोन महिन्यांपासून हिरडगावमध्ये लॉकडाउनच्या लालफितीत सापडले होते. तहसीलदार यांच्याकडे अर्ज करताच एक तासात स्थलांतर परवाना दिला. मजूर स्थलांतराबाबत प्रशासकीय यंत्रणेने सामाजिक जाणीवेतून काम केले. -मिलिंद दरेकर, हिरडगाव ---------------श्रीगोंद्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदी आदेशाचे पालन केले. त्यामुळे कोरोनाची तालुक्यात एन्ट्री झाली नाही. श्रीगोंद्यात अडकलेल्या मजुरांना घरपोहच करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला मेहनत घ्यावी लागली. पण ते नागरिक त्यांच्या घरी पोहचले, यात आनंद आहे. -महेंद्र महाजन, तहसीलदार -----------फोटो- १७ श्रीगोंदाश्रीगोंदा तालुक्यातील मजुरांची त्यांच्या प्रांतात घरवापसी करण्यात आली. यावेळी त्यांची बसमध्ये व्यवस्था करताना प्रशासनातील अधिकारी.