अहमदनगर : महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारीही कोरोनाबाधित झाले आहेत. यामध्ये ९६ जणांचा समावेश आहे. यातील ५५ जणांना बरे वाटत असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून, ३९ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांचीही प्रकृती उत्तम असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी सांगितले.
बाधित झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये श्रीगोंदा-पारनेर, पाथर्डी, श्रीरामपूर, कर्जत, शिर्डी येथील प्रांताधिकारी कार्यालये, तसेच नगर, नेवासा, श्रीगोंदा, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहुरी, कर्जत, जामखेड, कोपरगाव, राहाता या तहसील कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील १४ कर्मचारी बाधित आहेत. जामखेड तहसीलमधील एक, तर संगमनेर तहसील कार्यालयातील एक अशा दोघाजणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, त्यांच्या वारसांना मदत देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.