संगमनेर/ घारगाव : तालुक्याच्या पठार भागातील बोटा, केळेवाडी, माळवाडी, आंबीदुमाला आदी गावे सोमवारी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली होती. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मंगळवारी महसूल विभागाच्या अधिका-यांनी पाहणी करुन दिलासा नागरिकांना दिला. बोटा, केळेवाडी, माळवाडी ,आंबीदुमाला, कुरकुटवाडी, कुरकुंडी, घारगाव या गावांना सोमवारी सकाळी ८.३६ मिनीटांनी भूकंपाचा धक्का बसला होता. नाशिक येथील मेरी संस्थेच्या भूकंप मापक यंत्रावर २.८ इतक्या तीव्रतेची नोंद झाली होती. प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, मंडलाधिकारी अशोक रंधे यांनी बोटा व परिसरात भेट देऊन जनजागृती केली. यावेळी घाबरून न जाण्याचे आवाहन केले. भूकंपाच्या माहिती संदर्भातील माहिती पत्रक देखील त्यांनी वाटले. याप्रसंगी बोटा गावचे सरपंच विकास शेळके, पोलीस पाटील शिवाजी शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
भूकंपाचे धक्के बसलेल्या गावांची महसूल अधिकाºयांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 4:16 PM