संगमनेर : शहर व तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने तातडीने करावयाच्या उपाययोजना, कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी प्रशासनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विविध सूचना केल्या.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे ही बैठक घेण्यात आली. आ.डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगळुरे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, डॉ. संदीप कचोरिया, डॉ. राजकुमार ज-हाड, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, महेश वाव्हळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत तालुका व शहरातील कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना, लसीकरण, कोविड केअर सेंटर, तालुक्यातील रुग्ण तपासणी व्यवस्था याबाबतची माहिती महसूलमंत्री थोरात यांनी घेतली. प्रशासकीय अधिका-यांना सूचना केल्या.
...
कोरोना लस घ्या
लॉकडाऊन हा पर्याय नसून स्वत:ची काळजी घेणे, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना लस उपलब्ध झाली असून नागरिकांनी कोणतीही शंका न बाळगता ही लस घ्यावी. आगामी काळात लग्न सोहळे, घरगुती समारंभांत गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्सचे पालन करावे. काही लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार करावेत, असे आवाहन मंत्री थोरात यांनी केले.