हा रस्ता ब्रिटिश काळापासून बंद होता. केलवड ग्रामपंचायत गावचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांनी बरेच रस्ते शिवार वाहनाचे खुले केले. केलवड ते अस्तगाव ह्या दोन गावांना जोडणारा रस्ता केलवडच्या राम मंदिरापासून सुरू होतो. केलवड गावातील वारकरी मंडळी ह्या रस्त्याने खंडोबाची काठी मिरवणूक वाकडी खंडोबा मंदिराकडे नेत होते. परंतु सध्या रस्ता पूर्ण नसलेल्या रस्ता बंद आहे. हा रस्ता खंडोबाच्या काठीचा जुना रस्ता आहे. पिंपळसच्या उपाध्ये भट्टी पासून हा रस्ता पिंपळस पासून एक किलोमीटर खुला झाला आहे. फक्त सहाशे फूट रस्ता हा बंद आहे. दोन गावांना दळणवळण करण्यासाठी शासन स्तरावर योग्य तो निर्णय घेऊन ह्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा शिवार वाहनासाठी खुला करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहेत.
२६ केलवड