ग्राहकांना त्याच्या आवडीप्रमाणे तांदळाची निवड करून रास्त दरात खरेदी करता यावी, यासाठी गुरू सुपरमार्केटने २०१४ ला गुरू तांदूळ महोत्सवाची सुरुवात केली. तांदूळ जेवढा जुना होतो, तेवढा तो खाण्यासाठी अधिक चांगला असतो, असे गुरू सुपर मार्केट संचालक जयराम गाबरा यांनी सांगितले.
महोत्सवात तांदळाचे दर तुलनेने कमी राहतात. तांदळाचा दर्जा उच्च आणि वास चांगला राहतो. ५० किलो, १०० किलो तांदूळ साठविणे अशक्य होतो; पण आता ५ किलोपासून २५ किलोपर्यंत तांदळाचे पॅकिंग उपलब्ध केल्याने ग्राहकांना आवडीनुसार तांदळाची खरेदी करून साठवणूक करता येणे शक्य झाले आहे.
महोत्सवामध्ये प्रामुख्याने कोलम, आंबेमोहर, बासमती, काली मूछ, सेला, चिन्नोर, इंद्रायणी, आदी उपलब्ध आहेत. क्विक कुकिंग ब्राऊन बासमती उपलबध करून दिला आहे.
(वा.प्र.)