तिसगाव : कासारपिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे सरपंच मोनाली राजळे यांच्या संकल्पनेतून उखाणे, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात, चमचा लिंबू अशा विविध स्पर्धां रविवारी सायंकाळी घेण्यात आल्या.
आमदार मोनिका राजळे, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, उपसभापती मनीषा वायकर, जिल्हा परिषद सदस्या संध्या आठरे, नगरसेविका मंगल कोकाटे आदींसह गावातील ज्येष्ठ महिलांनी सहभाग घेतला. जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या आवारात ही स्पर्धा ‘हास्यसम्राट फेम’ राजीव सुरवसे यांच्या खुमासदार सूत्रसंचलनामुळे रात्री नऊपर्यंतच्या गुलाबी थंडीत चांगलीच रंगली. घरटी महिलांचा सहभागप्रसंगी होता. सुंदरबाई नानी राजळे अध्यक्षस्थानी होत्या. संगीत खुर्चीमध्ये प्रतिभा योगेश राजळे यांनी बाजी मारली. बकेट बॉलमध्ये कोमल भीमराज राजळे, शुभांगी नामदेव राजळे ही जोडी पहिली आली तर सुरेखा अनिल औताडे व मनीषा मायकल खंडागळे ही जोडी दुसरी आली. चमचा लिंबूमध्ये पल्लवी विकास तुपे विजेत्या ठरल्या.
तळ्यात मळ्यात स्पर्धेत भारती अश्विन राजळे अव्वल ठरल्या. तीन पायाच्या शर्यतीत पल्लवी विकास तुपे आणि शुभांगी नामदेव राजळे यांनी विजय मिळविला. परीक्षक म्हणून मिलिंद गायकवाड, लक्ष्मण देशमुख यांनी काम पाहिले. प्रास्ताविक सरपंच मोनाली राजळे यांनी केले. उज्ज्वला म्हस्के यांनी आभार मानले.
प्रा. निर्मला काकडे, सुनंदा बडे, धनश्री म्हस्के, केशरबाई राऊत यांनी परिश्रम घेतले.
फोटो : ०८ कासारपिंपळगाव
कासारपिंपळगाव येथील हळदी-कुंकू कार्यक्रमातील विजेत्यांना बक्षीस देताना आमदार मोनिका राजळे व इतर.