यावेळी परांडे बोलत होते. ते म्हणाले, श्रीरामलल्लांचे मंदिरात विराजमान होण्याने भारताच्या सांस्कृतिक विजयावर शिक्कामोर्तब होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मार्गदर्शन, पूजनीय संतांचे आशीर्वाद व विश्व हिंदू परिषदेच्या स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या सर्वात मोठ्या सांस्कृतिक आंदोलनाने प्रत्येक भारतीय मनामनात संस्कृतीबद्दल श्रद्धेचा भाव जागृत झाला आहे, असेही ते म्हणाले.
विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटन मंत्री श्रीरंग राजे, प्रांत सहमंत्री संजय मुद्राळे, पतित पावन संघटनेचे प्रांत अध्यक्ष एस. झेड. देशमुख, डॉ. प्रवीणकुमार पानसरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका सहसंघचालक सुभाष कोथमिरे, अभियान जिल्हाप्रमुख श्रीकांत नळकांडे, संगमनेर तालुका अभियान प्रमुख विशाल वाकचौरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप ठाकूर यांनी केले. अश्विन बेल्हेकर यांनी आभार मानले.