अहमदनगर : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून रिमझीम पाऊस झाला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता शनिवारी पावसातच झाली. शनिवारी रात्रीही अनेक ठिकाणी हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळला. दरम्यान रविवारी सकाळपासून रिमझीम पाऊस सुरूच आहे.शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नेवासा तालुक्यातील कुकाणा परिसरात २० मिनीटे जोरदार पाऊस कोसळला. रात्री रिमझीम सुरू होती. सोनईसह मुळाकाठ परिसरातही अधुनमधून हलक्या ते मध्यम सरी शनिवारी रात्री सुरू होत्या. पाचेगाव परिसरातही पाऊस झाला. पाचेगाव येथे २४ तासात ५९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ब्राम्हणी परिसरात जोरदार वाºयासह पावसाच्या सरी कोसळल्या. भेंडा परिसरातही शनिवारी रात्री जोरदार सरी कोसळल्या. जामखेड तालुक्यातील हळगाव पसिरातील अरणगाव, पिंपरखेड ेयेथे रात्री उशीरापर्यंत रिमझीम पाऊस कोसळला. यादरम्यान वा-यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. कर्जत तालुक्यातील कुळधरण परिसरात पाऊस झाला. राशीन मंडलात समाधानकारक पाऊस झाला. रविवारी सकाळीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरूच होता. हवामान खात्याने रविवार, सोमवारीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
अहमदनगर शहरासह जिल्ह्यात रिमझीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:50 PM