राहुरी : डिझेलच्या दरवाढीमुळे हार्वेस्टरचे दर वधारले आहेत. गहू काढण्यासाठी हार्वेस्टर चालकाला एकरी दोन हजार पाचशे रुपये मोजावे लागत आहेत.
गव्हाच्या उत्पादनातही घट झाली आहे. एकरी आठ ते १५ क्विंटल उत्पादन निघत आहे.
राहुरी तालुक्यात रब्बी हंगामाची काढण्याची लगबग सुरू आहे. ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. गव्हाचे पीक वाया जाऊ नये म्हणून गव्हाचे खळे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यांत्रिकी पद्धतीने गव्हाची मळणी केली जात आहे. गेल्या वर्षी गव्हाचे उत्पादन १२ ते १८ क्विंटल निघत होते. आता मात्र गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. उन्हाची तीव्रता वाढली असून गहू काढण्याच्या कामालाही वेग आला आहे. गहू काढल्यानंतर विक्रीसाठी बाजारात नेला जात आहे. गव्हाला १६०० ते २००० रुपये क्विंटल या दरम्यान भाव मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
...
यंदा डिझेलचे भाव वाढल्याने गहू काढण्याचे एकरी दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. गव्हाच्या उत्पादनात २० टक्के घट झाली आहे. यंदा मजुरांची टंचाई जाणवत आहे.
- ताराचंद गागरे,
शेतकरी, तांभेरे,राहुरी.