अहमदनगर : कोरोनाचा सर्वाधिक धोका ग्रामीण भागातच पाहायला मिळत आहे. सध्या अकोले, कर्जत, कोपरगाव, राहाता, नगर, जामखेड, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. राहाता, श्रीरामपूर आणि नगर या तीन तालुक्यांतच आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. सध्याही नगर शहरातील कोविड हॉस्पिटलमध्ये भरती होणारे सर्वाधिक रुग्ण हे ग्रामीण भागातूनच येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत असल्याचे दिसते आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. दुसऱ्या लाटेतही कोरोनाने ग्रामीण भागाला चांगलाच विळखा घातला आहे. प्रत्येक तालुक्यात कोरोनाला रोखणाऱ्या गावांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांत ९५ टक्के गावांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. रुग्णवाढीचा दरही काही ठिकाणी तिप्पट ते चौपट असल्याचे पाहायला मिळाले आहे. ग्रामीण भागात लसीकरण मोहीमही चालू आहे. मात्र केवळ लसीकरणाचे काम १० टक्केच झाले आहे. कोरोना चाचण्यांची संख्या सध्याच्या स्थितीत वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढत आहे. गतवर्षीच्या एप्रिल-मे मध्ये गावांनी केलेल्या कडक उपाययोजना सध्याच्या स्थितीत कुठेच आढळून येत नाहीत. त्यामुळे एकमेकांशी संपर्क जास्त येत असून गावाकडे येणाऱ्या पाहुणे मंडळींना क्वारंटाइन ठेवले जात नाही. तसेच गावामध्येही चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. अशा कारणांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.
--------------
तालुका एकूण रुग्ण सक्रिय रुग्ण सर्वाधिक रुग्ण असलेले गाव- रुग्णसंख्या बाधित गावे मुक्त गावे
नगर शहर ४१८७७ ५६११ --- --- ---
अकोले ६८८५ ११५६ अकोले-१८२ १५४ ३७
जामखेड ४२९१ ५२०
कर्जत ६८५५ १४६७
कोपरगाव ७७०८ ९९२ ---- ७९ ००
नगर ग्रामीण १०७६८ २१९३ नागरदेवळे-१२२ ८४ १६
नेवासा ६५७० १११३ नेवासा खुर्द-३१७ ११७ १४
पारनेर ६४८१ ९४७ सुपा-१६७ १२५ ०६
पाथर्डी ७७५५ ८५५
राहाता १२५७८ १७४६
राहुरी ६९५५ ११५६
संगमनेर १२५५९ १५२० घुलेवाडी-१८२ १६८ ०४
शेवगाव ६०४७ ९२३
श्रीगोंदा ५३४६ ७७९
श्रीरामपूर ८३४९ ११९८
-----------------------------------
जिल्ह्यात मृत्यूचे तांडव (ग्राफ)
नगर शहर -६२६
अकोले-३२
जामखेड-५२
कर्जत-३९
कोपरगाव-४३
नगर ग्रामीण-१४३
नेवासा-१००
पारनेर-९४
पाथर्डी-६२
राहाता-१११
राहुरी-१०१
संगमनेर-८३
शेवगाव-५४
श्रीगोंदा-७१
श्रीरामपूर-१०२
भिंगार-४७
मिलिटरी हॉस्पिटल-०
इतर जिल्ह्यांतील-१६
इतर राज्यांतील-०
एकूण-१७७६
----------------
-डमी
नेट फोटो २२ कोरोना इन रुरल डमी
डेथ
ब्रीथ क्लीपार्ट- ऑक्सिजन
ऑक्सिजन बेड