अहमदनगर: नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे़ येत्या डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी बँकेने सहकार खात्यातील उपायुक्तांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून, शनिवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबत मंजुरी घेतली जाईल, अशी माहिती खासदार तथा बँकेचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली़नगर अर्बन बँकेचा कारभार पारदर्शक आहे़ शासनाच्या नियमानुसारच बँकेचा कारभार सुरू आहे़ त्यामुळे न्यायालयाने बँकेच्या बाजूने निर्णय दिला असल्याकडे खा़ गांधी यांनी लक्ष वेधले़ गांधी म्हणाले, बँकेच्या मल्टीस्टेट दर्जाबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून, सभासदांचा शेअर एक हजार रुपये करण्याचा निर्णयदेखील योग्यच आहे़तसा निर्णय न्यायालयाने दिला आहे़बँकेचे १ लाख ७ हजार सभासद सभासद आहेत़ त्यापैकी ४९ हजार ५०० सभासदांनी एक हजार रुपयांचा शेअर धारण केला आहे़ उर्वरित सभासदांना निवडणुकीच्या ६० दिवसआधीपर्यंत एक हजारांचा शेअर धारण करता येणार असून, एक हजार रुपये शेअर्स घेणाऱ्यांनाच मतदान करण्याचा अधिकार असणार आहे, असे यावेळी गांधी यांनी सांगितले़ बँकेची १०० कोटींची उलाढाल आहे़ मात्र न्यायालयात याचिका दाखल असल्यामुळे बँकेला नवीन शाखा उघडणे शक्य झाले नाही़ बँकेची निवडणूक यापूर्वीच घेणे आवश्यक होते़ पण न्यायालयीन अडचणींमुळे निवडणूक घेणे शक्य झाले नाही़ न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे़ त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार खात्याचे उपायुक्त एऩएस़ खडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असल्याचे गांधी यांनी सांगितले आहे़ बँकेचे संचालक दीपक गांधी, नवनीत सुरपुरिया, रमेश परभाणे, शैलेश मुनोत, संजय लुणिया, अनिल कोठारी, राजेंद्र लुणिया, विजय पाटोळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन गांधी उपस्थित होते़(प्रतिनिधी)आज सर्वसाधारण सभाबँकेची शनिवारी सहकार सभागृहात सर्वसाधारण सभा होत आहे़ यासभेत संचालक मंडळाच्या निवडणुकीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे़ विरोधकांनी याबाबत पत्रक काढून बँकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़ वसुलीबाबत कारवाई सुरू असून, त्याची मुदत संपुष्टात आली आहे़ वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे अधिकार बँकेला नाही, असा आरोप पत्रकात केला आहे़ यामुळ सभा वादळी होण्याची शक्यता आहे़
नगर अर्बनच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा
By admin | Published: September 05, 2014 11:41 PM