सार्वजनिक बांधकाम विभागाने काही दिवसांपूर्वी विसापूर- देवदैठण या प्रमुख जिल्हा मार्गाचे खड्डे बुजविण्याचे काम केले. मात्र, या मार्गावर चांभूर्डी व सारोळा सोमवंशी दरम्यानचा रस्ता खड्डे बुजविण्याचे काम योग्य नसल्याने या रस्त्याचे तीन किलोमीटर नूतनीकरण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. अद्यापपर्यंत हे काम न झाल्याने सारोळा सोमवंशी, कडूस, पाडळी व भोयरे गांगर्डा येथील लोकांना विसापूरला या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागते.
..............
सारोळा सोमवंशी हे गाव श्रीगोंदा तालुक्यातील टोकाचे गाव आहे. दळणवळणाच्या दृष्टीने आमच्यासाठी व पारनेर तालुक्यातील दोन तीन गावांना हा रस्ता महत्त्वाचा आहे. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. लवकर काम मार्गी लावण्यात न आल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल.
- उज्ज्वला आढाव, सरपंच, सारोळा सोमवंशी