भेंडा : नेवासे तालुक्यातील भेंडा परिसरात रविवारी रात्री रोहिणी नक्षत्राच्या सरी बरसल्या. सुमारे तीन इंच पावसाची नोंद झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. खरीप हंगामाच्या तयारीची लगबग आता सुरू होणार आहे.
परिसरातील देवगाव, रांजणगाव, नागापूर, खुणेगाव, गोंडेगाव, नजिक चिंचोली, तरवडी, कुकाणा येथे मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस झाला. यावेळी सोसायट्याचा वारा सुटला होता. वादळामुळे कांदा भिजू नये म्हणून शेतकºयांची धांदल उडाली. काही ठिकाणी कांदा भिजला. उसाचे पीक भूईसपाट झाले.
पाचेगाव परिसरात रविवारी मध्यरात्री विजेचा कडकडाट व जोरदार वाºयासह पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.