शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

कर्जतला भाजपच्या बैठकीत रोहित पवारांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2020 6:24 PM

माहीजळगाव (ता. कर्जत) येथे सोमवारी (दि.९) होणा-या महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रम पत्रिकेवर व बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेख नसल्याने कर्जत भाजपच्या वतीने रविवारी आमदार रोहित पवार यांचा निषेध नोंदविण्यात आला.

कर्जत : माहीजळगाव (ता. कर्जत) येथे सोमवारी (दि.९) होणा-या महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रम पत्रिकेवर व बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेख नसल्याने कर्जत भाजपच्या वतीने रविवारी आमदार रोहित पवार यांचा निषेध नोंदविण्यात आला.रोहित पवार यांच्या पुढाकाराने सोमवारी माहीजळगाव येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ आदी उपस्थित राहणार आहेत. या अभियानात राबविण्यात येणाºया विविध योजनांपैकी ८० टक्के योजना केंद्र सरकारच्या आहेत. येथे होणाºया महाराजस्व अभियानाचे नियोजन करताना केवळ केंद्राच्या योजनांचे श्रेय घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खासदार डॉ. सुजय विखे यांचा नामोल्लेखही केला नाही, असा कर्जत भाजपचा आरोप आहे.रविवारी कर्जत येथे आयोजित बैठकीत भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रोहित पवार यांचा निषेध नोंदविला. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. सुनील गावडे, तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी अध्यक्ष अशोक खेडकर, बाजार समितीचे उपसभापती प्रकाश शिंदे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, युवा नेते स्वप्निल देसाई, सचिन पोटरे, भाजपचे शहराध्यक्ष रामदास हजारे, बापुराव गायकवाड, अल्लाउद्दीन काझी, धनंजय मोरे, अंगद रुपनर, पप्पू धोदाड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतBJPभाजपाRohit Pawarरोहित पवारPoliticsराजकारण