शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

कालवेप्रश्नी अडवाआडवीची भूमिका योग्य नाही : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:28 PM

राज्यकर्त्यांची आडमुठेपणाची भूमिका आता सर्वसामान्य जनता खपवू घ्यायला तयार नाही

तळेगाव दिघे : राज्यकर्त्यांची आडमुठेपणाची भूमिका आता सर्वसामान्य जनता खपवू घ्यायला तयार नाही. अशा परिस्थितीत कोणत्याही शासनाच्या कामात काही अडचण असेल, तर बसून प्रश्न मिटला पाहिजे. निळवंडेचा प्रश्न आपण कायम उचलून धरला आहे. सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. निळवंडे कालवेप्रश्नी अडवाआडवीची भूमिका आताच्या कालखंडात योग्य नाही, असे प्रतिपादन राज्याचे जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले.संगमनेर तालुक्यातील तिगाव येथे रविवारीशेतकरी ग्रामस्थांच्या बैठकीत पालकमंत्री प्रा. शिंदे बोलत होते. भाजपाचे नेते राम राजू, तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, डॉ. अशोक इथापे, विनायक गुंजाळ, राजाभाऊ कांदळकर, गोविंद कांदळकर, भगवान सानप, नामदेव दिघे, पुंजाहरी दिघे, पाटीलभाऊ दिघे, सरपंच लता गायकवाड, वाळीबा सानप, संजय सानप, मच्छिंद्र सानप, नामदेव सानप, संतोष सानप, दिनकर गायकवाड, सीताराम सानप, भीमराज उगलमुगले, ज्ञानेश्वर सानप, रखमा कांदळकर, मधुकर सानप, रामनाथ सानप, तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते.तिगाव ग्रामस्थांनी गावाच्या एकोप्यातून मंदिर बांधले. श्रद्धेतून अशी कामे होतात. अवर्षणप्रवण क्षेत्रातील असलेला हा भाग सातत्याने दुष्काळाच्या संघर्षाला तोंड देतोय. निळवंडे व भोजपूर धरणाचे पाणी केंव्हा ना केंव्हा येईल, या प्रतीक्षेत हा भाग आहे. निळवंडे अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा होती. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारने साईबाबा संस्थानकडून निधी उपलब्ध करून दिला.आता काम होणे बाकी आहे. सातत्याने आपण असे आडवे पडत राहिलात तर लोक सुद्धा तुम्हाला कधी ना कधी आडवे केल्याशिवाय राहणार नाही.समाजकारण व राजकारणामध्ये काम करीत असताना अशा पद्धतीने काम अडविणे बरोबर नाही. आपल्या गावामध्ये लाईट यायची असली तरी त्यासाठी कुणाच्या शेतात खांब टाकल्याशिवाय वीज येत नाही. पाटाने पाणी यायचे असेल तर वरच्या भागातील लोकांनी जमीन उपलब्ध करून दिल्याशिवाय खालच्या भागातील लोकांना पाणी येत नाही. पाणी वरून काढायचे असेल, तर दंड वरून काढावा लागतो, खालून काढता येत नाही. पालकमंत्री या नात्याने निळवंडे कालव्यांच्या प्रश्नात लक्ष घालीन, असेही ते म्हणाले.यावेळी पालकमंत्री शिंदे यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार केला. सूत्रसंचालन शरद उगलमुगले यांनी केले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस