१७ महाराष्ट्र बटालियनच्या मुख्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी वार्षिक सभेमध्ये कर्नल जीवन झेंडे बोलत होते. सुरुवातीला राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. त्यानंतर बटालियनमध्ये व स्वच्छ भारत अभियानामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मेजर डॉ. संजय चौधरी यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. नव्याने एनसीसीमध्ये अधिकारी बनलेल्या लेफ्टनंट डॉ. एम. एस. जाधव, लेफ्टनंट डॉ. सुभाष आगळे, लेफ्टनंट भरत होळकर, लेफ्टनंट नारायण गोरे, लेफ्टनंट सतीश चोरमले, थर्ड ऑफिसर अमोल दहातोंडे, थर्ड ऑफिसर अजय महाजन यांना बटालियन कमांडर कर्नल जीवन झेंडे यांच्या हस्ते व सर्व एनसीसी अधिकाऱ्यांच्या तसेच सुभेदार मेजर लोकेंद्रर सिंग यांच्या उपस्थितीमध्ये रँक प्रदान करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुभेदार सयाजी जाधव, सुभेदार सतेदरसिंग, मेजर लोकेंद्रर सिंग, रमेश गांगर्डे, गणेश वामन, तसेच सर्व नॉन कमिशन अधिकारी व बटालियन स्टाफने विशेष परिश्रम घेतले. कर्नल जीवन झेंडे यांनी कोरोनामध्ये छात्रसेनेने केलेल्या गौरव कामगिरीचा आढावा घेऊन सर्व अधिकाऱ्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. मेजर डॉ. संजय चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
-----------
फोटो - २३एनसीसी
१७ महाराष्ट्र बटालियनच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमप्रसंगी कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे.