अहमदनगर : राज्य शासनाने कर्जत तालुक्यासाठी १० कोटी ४० लाख तर जामखेड तालुक्यासाठी ४ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दोन्ही तालुक्यातील विविध रस्त्यांचे डांबरी नूतनीकरण अथवा मजबुतीकरणासह नूतनीकरणासाठी हा निधी मिळावा, यासाठी पालकमंत्री राम शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.रस्ते देखभाल दुरुस्ती योजनेतर तरतुदीतून मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत या रस्त्यांना त्यात समाविष्ट करुन निधी उपलब्ध करुन देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पाठपुरावा केला होता. या विभागाने ही मागणी मान्य करुन तब्बल १५ कोटी एवढा निधीही मंजूर केला आहे. यापूर्वी या रस्त्यांसाठी १० कोटी रुपये यापूर्वीच देण्यात आले होते.बनपिंपरी तालुका हद्द - निमगाव गांगर्डा ते घुमरी (०.४ किमी), घुमरी ते बेलगाव (४.६ किमी), कोकणगाव ते खळगाव(४.१ किमी), कोंभळी ते कोंडाणे (४ किमी) अशा १३.१० किमी रस्त्यांच्या कामांसाठी २ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.सुपा ते गायकरवाडी या मार्गावर सुपा ते बहिरोबावाडी(१.६ किमी), गोयकरवाडा ते खंडाळा(१.५ किमी) अशा एकूण ३.१० किलोमीटर रस्त्यांच्या कामांसाठी 80 लाख निधीची तरतूद करण्यात आली आहे. मिरजगाव ते गोदर्डी (२.६५ किमी) -८० लाख, राज्य मार्ग ६७ ते जमादारवाडा (०.८ किमी) -४० लाख, लोणी मसदपूर ते जळकेवाडी (२.७ किमी) - ९० लाख, धालवडी ते तळवडी (०.८५ किमी) - ४० लाख, राशीन ते परीटवाडी (२.७ किमी) - ८० लाख, दुधोडी ते बेर्डी (४.२ किमी)- १ कोटी ३० लाख आणि धुमकाई फाटा ते करमनवाडी (२.५ किमी) -७० लाख, राज्य मार्ग १० ते आरणगाव - वाळकी या मार्गावर तालुका हद्द ते खांडवी (४.७ किमी) आणि रुईगव्हाण ते कोपर्डी (२.२) अशा एकूण ६.९ किलोमीटर रस्त्यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. करमनवाडी फाटा ते खेडफाटा (२.८५) रस्त्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.जामखेड तालुका :-जामखेड तालुक्यातील विविध रस्त्यासाठीही ४ कोटी ६० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात पाटोदा ते धनोरा (१ किमी), पिंपरखेड ते मलठण(२ किमी) अशा ३ किमी रस्त्यांसाठी ९० लाख रुपये, सारोळा ते खुरदैठण (१.६१ किमी)-५० लाख, खर्डा रोड ते बांधखडक (१ किमी)-३० लाख, चौंडी ते गिरवली (१ किमी), कवडगाव ते अरणगाव (१ किमी), पारेवाडी ते डोणगाव (१.५० किमी) अशा एकूण ४.५० किलोमीटर रस्त्यांसाठी ९० लाख रुपये, चोभेवाडी ब-हाणपूर जवळके (०.८ किमी), पोतेवाडी फाटा-मोरेवस्ती (१ किमी), सातेफळ-खर्डा (०.५० किमी) आणि अरणगाव - फक्राबाद (१ किमी) या एकूण २.५० किमीसाठी ५० लाख, कुसडगाव ते पाडळीफाटा (२ किमी), पाडळी ते खूरदैठण (२.६० किमी), खूरदैठण ते घोडेगाव (१.७० किमी) अशा ६.३० किमी रस्त्यासाठी १ कोटी २० लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
कर्जत - जामखेडमधील रस्त्यांसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:04 PM