कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेजारील लोकनेते स्व.मारुतराव घुले पाटील मंगल कार्यालयात माजी आमदार नरेंद्र घुले व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या १०० खाटांचे स्वर्गीय मारुतराव घुले पाटील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, गट विकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी, नायब तहसीलदार मयूर बेरड, वैद्यकीय अधीक्षक रामेश्वर काटे, बाजार समितीचे सभापती अनिल मडके, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, संचालक संजय फडके, ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब नरवडे, कमलेश लांडगे, विजयराव देशमुख, राहुल देशमुख, नंदकुमार मुंडे उपस्थित होते.
घुले यांनी कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करून देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. लक्षणे दिसून आल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जावे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन दरम्यानच्या निर्बंधाचे सर्वांनी कडक पालन करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे यांनी तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांना भेटी देऊन सुरू असलेले लसीकरणाचा आढावा घेऊन उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची विचारपूस केली व मिळणाऱ्या सुविधांची माहिती घेत, तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.