शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
2
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
3
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
4
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
5
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
6
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
7
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
8
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
9
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
10
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
11
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
12
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
13
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
14
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
15
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
16
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
17
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
18
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
19
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार

‘त्या’ अफवेने ब्राह्मणीकरांची धाकधूक कायम; अनेक जण स्वत:हून क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 12:06 PM

गावातील क्वारंटाईन असलेल्या ‘त्या’ आजारी रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या सोशल मिडियावरील अफवांनी ब्राह्मणीकरांची दोन दिवसांपासून धाकधूक कायम आहे. अनेकांनी तर स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले. त्यामुळे गावात फिरणारे भितीने घरीच थांबून  आहेत.

 ब्राह्मणी : गावातील क्वारंटाईन असलेल्या ‘त्या’ आजारी रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याच्या सोशल मिडियावरील अफवांनी ब्राह्मणीकरांची दोन दिवसांपासून धाकधूक कायम आहे. अनेकांनी तर स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतले. त्यामुळे गावात फिरणारे भितीने घरीच थांबून  आहेत. तर संपर्कातील व्यक्तींनी चांगलाच धसका घेतला आहे. तीन दिवस झाले तरी अजून अहवाल आला नाही.      गुरुवारी (दि.९ जुलै) ब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेतील क्वारंटाईन केंद्रातून आजारी असलेल्या रुग्णास राहुरी कृषी विद्यापीठ कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. अधिकृत अहवाल प्राप्त नसताना शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर चुकीचा संदेश व्हायरल झाल्याने अनेकांना धक्काच बसला. 

दरम्यान, नागरिकांची एकच धांदल उडाली. याबाबाबत राहुरीचे तहसिलदार एफ.आर शेख व वैद्यकीय अधिकारी अविनाश जाधव यांना संपर्क केला असता अद्याप अहवाल आला नाही. अफवांवर विश्वास ठेवून घाबरून न जाण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यामुळे ब्राह्मणीतील जनतेला दिलासा मिळाला. 

दरम्यान, जिल्ह्यातील अनेक नातेवाईकांनी फोनवर ब्राह्मणीतील आपल्या नातेवाईकांकडे सोशल मीडियावरील संदेशाबाबत विचारणा केली. दिवसभर प्रत्येकाचा फोन खनखणले. त्यामुळे विनाकारण सगळ्यांचीच डोकेदुखी झाली. कोरोना पार्श्वभूमीवर  शुक्रवारी सकाळी कोरोना दक्षता समितीने महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये ब्राह्मणीत बसस्थानकावर पुन्हा चेक पोस्ट करून गावात येणारे व जाणारे व्यक्तींची तपासणी होईल. सोनई हॉटस्पॉट जाहीर करण्यात आल्याने १३ दिवस सोनईत न  जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. गत दोन तीन दिवसात सोनईवरून आलेल्या व्यक्तींनी स्वत:हून होमक्वारंटाईन व्हावे असे आहवान करण्यात आले. 

लग्न, अंत्यविधी, दहावा, तेरावा, वाढदिवस, कंदोरी आदी कार्यक्रम टाळावे. आयोजकांनी गर्दी जमविण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कारवाई होईल. सदर कार्यक्रमांना शक्यतो परवानगीच घ्यावी. मास्क न वापरणारे व बाजारतळावर गर्दी करणारºयांना व्यक्तींवर होणार कारवाई होईल. जिल्ह्याच्या बाहेरील पाहुणे गावात बोलावून त्यांना मुक्कामी ठेवण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा सबधितास जबाबदार धरण्यात येईल. अशा सूचना भोग्याद्वारे यावेळी देण्यात आली.

 अहवाल प्राप्त होताच आवश्यकता असल्यास पुन्हा ब्राह्मणीत लॉकडाऊन वाढविण्यात येईल. आजारी रुग्णास गुरुवारी राहुरी विद्यापीठ कोवीड सेंटरमध्ये दाखल केले. दरम्यान  त्याचे स्राव घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अहवाल मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, अहवाल प्राप्त झाला नव्हता. दिवसभर  अहवालाची वाट पाहणाºया ब्राह्मणीकरांचे फोन खात्री करण्यासाठी एकमेकांना सुरूच होते. सर्वांच्या नजरा आजही (शनिवारच्या) अहवालाकडे लागून आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाcorona virusकोरोना वायरस बातम्या