अहमदनगरमध्ये खड्डे चुकवत मतदान केंद्राकडे धावअहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी साचलेले आहे. तसेच अनेक भागांत चिखल झालेला आहे. खड्डे आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढत मतदार हे मतदान केंद्राकडे धाव घेत आहेत.
गेल्या आठवडाभरापासून नगरमध्ये पाऊस सुरू आहे. गेल्या तीन दिवसांपासून सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. नगर शहरातही मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमध्ये मोठे पाणी साचलेले आहे. ग्रामीण भागात रविवारी मोठी कसरत करीत मतदान यंत्रे केंद्रापर्यंत पोहोचली होती. सोमवारी सकाळी मतदान केंद्रावर जाण्यासाठी मतदारांना वाट शोधावी लागली. नगरमध्ये सगळीकडे खड्डेच खड्डे झालेले आहेत. मतदान केंद्राबाहेर चिखल झाल्याने केंद्रात जाण्यासाठी मतदारांना मोठी कसरत करावी लागली. अनेक केंद्राबाहेर पाणीही साठलेले आहे.नगर शहरात दुपारनंतर पावसाची शक्यता असल्याने नागरिक सकाळीच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.