शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सचिन तेंडुलकरच्या पत्नीने घेतली करंजी गावच्या शेतक-यांची भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 5:52 PM

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी आज करंजी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले.  अंजली तेंडुलकर यांनी करंजीस अल्पावधीत दोनदा भेट दिली आहे. त्यांना करंजी परिसराने जणू भुरळच घातल्याचे दिसून येते. 

करंजी (अहमदनगर ) : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी आज करंजी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचे आवाहन केले. अंजली तेंडुलकर यांनी करंजीस अल्पावधीत दोनदा भेट दिली आहे. त्यांना करंजी परिसराने जणू भुरळच घातल्याचे दिसून येते. रासायनिक शेती केल्याने जमिनीची सुपिकता कमी होते. सेंद्रिय शेतीही नैसर्गिक आहे, ही शेती करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. मी लहान मुलांची डॉक्टर असल्यामुळे पुढील वेळी आल्यावर मुलांच्या व स्त्रियांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करेन, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. करंजी परिसरातील भट्टीवाडी येथील शेतकरी सुरेश सिताराम क्षेत्रे व  महादेव गाडेकर हे करित असलेल्या सेंद्रिय शेतीची त्यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांनी पुढीलवेळी येताना मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना बरोबर घेऊन येण्याची विनंती त्यांनी मान्य केली. यावेळी सेंद्रिय शेतीवर संशोधन करणाऱ्या संस्थेच्या कालिया मॅडम तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. गावातील दिलीप अकोलकर व कैलास थोरात या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्याची तयारी दाखविली. यावेळी करंजीच्या सरपंच सौ. नसिम रफिक शेख, सुनिल साखरे, रफिक शेख, उपसरपंच शरद अकोलकर, छगनराव क्षेत्रे, मच्छिंद्र गाडेकर, महादेव गाडेकर, राजेंद्र पाठकसह मोठया संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

टॅग्स :Anjali Tendulkarअंजली तेंडुलकरAhmednagarअहमदनगर