लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन बगाटे यांनी दिले. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामदैवत मारुती मंदिराच्या दर्शनानंतर मंदिर परिसरातील शनि मंदिर, गणपती मंदिर, महादेव मंदिरासह समाधी, चावडी, द्वारकामाईचे दर्शन घेत असतात. अनेक वर्षांपासूनची ही अखंडित परंपरा चालू आहे. लॉकडाऊननंतर मंदिर खुले झाल्यानंतर संस्थानने गर्दी टाळण्यासाठी दोन नंबर गेटने आत व पाच नंबर गेटने बाहेर पडण्याची व्यवस्था केली. यामुळे शिर्डी ग्रामस्थांना मंदिर परिसरातील ग्रामदैवतांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. याशिवाय साईभक्तांना पाच नंबर गेटने बाहेर पडण्याची व्यवस्था करण्यात आली. तीन नंबर गेट बंद करण्यात आले. शिर्डीतील ८० टक्के व्यावसायिक तीन नंबर गेटच्या बाजूने आहेत. हे गेट बंद असल्याने या ठिकाणच्या सर्व व्यावसायिकांचे व्यवसाय मंदिर सुरू झाल्यानंतर बंदच आहे. ग्रामदैवतांचे ग्रामस्थांना दर्शन सुलभ व्हावे तसेच भाविकांना बाहेर पडण्याची सुविधा प्राप्त व्हावी यासाठी तीन नंबर गेट खुले करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
०८ निवेदन